कळंब – एप्रिल महिना सर्व धर्मीयांसाठी सण उत्सवाचा आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता सुरू आहे सर्व नियम व अटी याच्या आधीन राहून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी व ईद, सण ,जयंती उत्सव शांततेने आनंदाने साजरी करावेत असे आवाहन कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी दिनांक ८ एप्रिल रोजी कळंब पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समिती व पोलीस पाटील यांच्या बैठकीत केले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक आर.एस.सानप यांनी सामाजिक व आर्थिक विकासासाठी शांतता, सामाजिक सलोखा व अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून रमजान ईद,डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती,रामनवमी, हनुमान जयंती,भगवान महावीर जयंती साजरी होत आहे.हे उत्सव साजरे करीत असताना पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले त्याचबरोबर विविध कार्यक्रमासाठी परवानगी साठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कळंब यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्याविषयी माहिती दिली व जयंती उत्सव मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा असे सांगितले.बैठकीसाठी वीज वितरण कार्यालयाचे शहर अभियंता वैभव गायकवाड , नगरपरिषद अभियंता सुशील शेळके यांची उपस्थिती होती याप्रसंगी प्रकाश भडंगे ,राहुल हौसलमल,अमर गायकवाड, कुणाल मस्के, सतपाल बनसोडे, माधवसिंग राजपूत, रुकसाना बागवान, हांजी भाई हन्नुरे यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी ईद उत्सव समिती तसेच डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सदस्य ,पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हा शाखेचे पो.कॉ. श्रीराम मायंदे यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले