कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार रवी केसकर यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपी ला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली . धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रवी केसकर यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. केसकर काम आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंके नगर बेंबळी रोड या भागात मारहाण केली. चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. केसकर या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. त्यांची गाडी चोरून नेण्यात आली. ही गाडी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी , या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वर संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, संपादक एल. डी.शिंदे,बालाजी अडसूळ, शितल कुमार घोंगडे, सचिन क्षीरसागर, सतीश टोणगे, नर्सिंग खिचडे, दत्तात्रय गायके,रामजीवन बोंदर,एस.के पुरी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन