August 8, 2025

इयत्ता 3 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालीक मूल्यांकन चाचणी

  • धाराशिव (जिमाका) – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्याचे प्रथम भाषा,गणित व इंग्रजी या विषयांची मराठी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे. ही चाचणी 4,5 व 6 एप्रिल–2024 या दरम्यान होणार आहे.
    या चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, उत्तर सूची राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत पुरविण्यात आल्या आहेत.जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक)यांच्याकडे परीक्षा साहित्य वाटपाचे नियोजन आहे.नियतकालिक मूल्यांकन चाचणीनंतर वरील तीन विषयाव्यतिरिक्त इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका (इयत्ता 3,4,6,7 साठी) शाळास्तरावर शिक्षकांनी स्वतः तयार करून संकलित चाचणी दोनचे नियोजन करायचे आहे.शिक्षकांना प्रश्नपत्रिका काढण्यासाठी मार्गदर्शक म्हणून www.maa.ac.in यावर नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.चाचणीसाठीची वेळ सकाळी आठ ते दहा या दरम्यान असून स्थानिक गरजेनुसार फक्त वेळेतच बदल करता येणार आहे
    इयत्तानिहाय द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नांचे स्वरूपावर चाचणी आधारीत असणार आहे.चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची नोंद चॅट बॉट वर शिक्षकांनी ऑनलाईन करावयाची आहे.या चाचणीव्दारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूक सदयस्थिती पाहता येणार आहे.
    डायट मूल्यमापन विभागाच्या प्रमुख डॉ.शोभा मिसाळ या आहेत. इयत्ता पाचवी व आठवीसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) या सोबत स्वतंत्ररित्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेऊन शिक्षकांनी पुर्नपरीक्षा व निकाल संदर्भात कार्यवाही करावी. चाचणीसाठी अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!