हावरगाव (राजेंद्र बारगुले) – दिनांक २२ मार्च २०२४ रोजी हावरगाव येथे स्वयम् शिक्षण प्रयोग,ग्रामपंचायत व जि.प. प्राथमिक शाळेच्या वतीने जागतिक जल दिवस साजरा केला. यानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.पाणी आडवा पाणी जिरवा,वृक्ष लावा वृक्ष वाढवा,जल है तो कल है अशा विविध घोषणाने मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास गावचे सरपंच राऊत, ग्रामसेविका सौ.झगडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अजय सरवदे, स्वयम् शिक्षण प्रयोगचे उमेश मडके, लिडर अनिता कोल्हे, रेशमा कोल्हे शाळेतील सहशिक्षका सौ.तावरे,सौ.परीट,सहशिक्षिक शेळके,जगताप हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना,पाणी काटकसरीने वापर करावा, बांधबंदिस्ती करावी,पाण्याचे महत्व समजून सांगितले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड