कळंब (अरविंद शिंदे) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ मार्च २०२४ रोजी शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा विज्ञान विभाग तसेच पुणे येथील IFAS Edutech Institute यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित केलेली होती. या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन १३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ.राजीव अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील पवार,कोऑर्डिनेटर डॉ.एच.के.भगवान,कार्यशाळेचे प्रास्ताविक कन्व्हेनर प्रा.सुरज पाटील यांनी केले.ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ.जयवंत ढोले यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ.पल्लवी उंद्रे,डॉ.विश्वजित मस्के,डॉ.हेमंत चांदोरे,डॉ.सुरेश वेदपाठक,डॉ. सुशील जमाले यांनी उपस्थिती नोंदवली. या कार्यशाळेसाठी तांत्रिक काम अरविंद शिंदे यांनी पाहिले.या कार्यक्रमाला संतोष मोरे,अभिमन्यू हाके,अजय भावे, चांगदेव खंदारे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले