February 10, 2026

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – डॉ. सतिश हरिदास

  • धाराशिव (जिमाका) – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “राष्ट्रीस पल्स पोलिओ लसीकरण मोहिम” 3 मार्च 2024 पासून राज्यात सर्वत्र आयोजित होणार आहे यावेळी 0 ते 5 वर्षेवयोगटातील मुलांमुलींना या लसीची मात्रा सर्वत्र दिली जाणार आहे. आपल्या देशातून / राज्यातून पोलिओ रोगाचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सन 1995-96 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.मागील 13 वर्षापासून भारतात एकही पोलिओची केस आढळलेली नाही. त्यामुळे मार्च 2024 मध्ये भारतातुन पोलिओचे समुळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरावर प्राप्त आहे.
    प्राप्त जिल्हयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत दिनांक 03 मार्च 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयात ग्रामीण भागात 1 हजार 218 व शहरी भागात 123 असे एकुण 1 हजार 341 लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हयात 44 प्राथमिक आरोग्य केंद्र, 1 स्त्री रुग्णालय, 1 जिल्हा रुग्णालय, 1 शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व 1 शासकिय आयुर्वेद महाविद्यालय कार्यान्वीत आहे. या राष्ट्रीय मोहिमे अंतर्गत 5 वर्षाच्या आतील अपेक्षित 1 लाख 69 हजार 870 बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता (नविन जन्म झालेल्या किंवा बाळ आजारी असेल तर वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार ) पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.
    जिल्हयातील 1 लाख 69 हजार 870 ग्रामीण भागातील 1 लाख 42 हजार 107 आणि शहरी 27 हजार 763 अपेक्षित लाभार्थी संख्या असुन धाराशिव जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत. तर एकुण वाडयावस्त्या 805 त्यात गावे 735, तर वाड्यावस्त्या 70 आहेत. जिल्हयात एकुण लसीकरण केंद्र 1 हजार 341 त्यापैकी शहरी 123, तर ग्रामीण 1 हजार 218 एवढे आहेत. बूथ वरील कार्यरत कर्मचारी 3 हजार 317 यामध्ये आरोग्य कर्मचारी 482, आरोग्य पर्यवेक्षक 190, अंगणवाडी कार्यकर्ती 1 हजार 804, अंगणवाडी मदतनीस 1 हजार 765, तर आशा 1 हजार 207, पर्यवेक्षक 260 (ग्रामीण- 238, शहरी – 22) वैद्यकिय अधिकारी 123 ( ग्रामीण – 103, शहरी – 20) एवढी यंत्रणा कार्यरत आहे.
    या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मध्ये समाजाचा सहभाग मिळवण्यासाठी जिल्हास्तरावरुन नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वार्ड / गाव / वस्ती / तांडा येथे म्हणी, पोस्टर्स, स्टीकर्स व मायकिंग द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आणि मोहिमेच्या आदल्यादिवशी म्हणजेच दिनांक 2 मार्च 2024 रोजी ग्रामीण व शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी जनजागृती करीता काढण्यात यावी.
    तसेच बूथ वरील म्हणजेच 3 मार्च 2024 रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रमासाठी तसेच त्यानंतर 3 व 5 दिवस घर भेटीद्वारे राहिलेल्या बालकांना लस देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपापल्या 0 ते ५ वर्षे वयोगटातील मुलामुलींना बाळ नुकतेच जन्माला आले असले तरी, बाळ आजारी असले तरी कुण्या पाहुण्याचे बाळ घरी आले असले तरी, नियमित लसीकरणात डोस दिला असला तरी, सर्वांनी या मोहिमे दिवशी पोलिओची मात्रा आपल्या बालकांना दयावी. ही पोलिओ ची मात्रा तोंडावाटे फक्त दोन थेंब देण्यात येते ही लस सुरक्षित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
error: Content is protected !!