August 10, 2025

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पद भरतीत पात्र उमेदवारांची 4 मार्चला कागदपत्र पडताळणी

  • धाराशिव (जिमाका) – पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनमध्ये २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उपलब्ध झाली आहे.पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करुन संबधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत आदेश प्राप्त झाले आहेत.
    त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी ४ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद,धाराशिव येथे पूर्ण करण्यात येणार आहे.पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील शिक्षणसेवक पदासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी नमूद मुळ कागदपत्रासह एक स्वसाक्षांकीत स्वतंत्र झेरॉक्स प्रतीसह तपासणीसाठी कै.यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद,धाराशिव येथे ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करुन घ्यावयाची आहे.तसेच शैक्षणिक अर्हतेची स्वसाक्षांकीत झेरॉक्स प्रती ४ मार्च २०२४ पुर्वीही कार्यालयीन वेळेत सादर करु शकतील याची नोंद घ्यावी.संबधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहील्यास संबधित उमेदवाराची अनुपस्थिती आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना कळविण्यात येईल. त्यानुसार पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल.उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबत सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!