February 8, 2026

आय.टी.आय. प्रशिक्षणार्थी यांच्याकडून अनोखी मानवंदना

  • कळंब – स्वच्छ्ता पंधरवडा,स्वच्छ्ता हीच सेवा अंतर्गत कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी बस आगार व बस स्थानक कळंब येथे सकाळी १० ते ११ या वेळेत ६० प्रशिक्षणार्थी आणि १५ कर्मचारी यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कौशल्य व उद्योजगता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने शिवडी किल्ला मुंबई येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ०१ तासाच्या श्रमदानाचे उद्घाटन करण्यात आले. 
  • यावेळी कौशल्य विकास व उद्योजगता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचानालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते. त्यानुषंगाने संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटनिदेशक शामकांत डोंगे, मुख्यलिपिक रविचंद्र जगदाळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख अतुल वाघमारे यांच्या नियोजनात सदरील श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कळंब बस आगारप्रमुख पी.एम. करवंदे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, कळंब नगरपरिषदचे स्वच्छ्ता निरीक्षक संजय हाजगुडे, नगरपरिषदचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण वाघमारे, विक्रम समुद्रे उपस्थित होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी, कर्मचारी यांनी प्राथमिक सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, हातमोजे परिधान केले होते. जेणेकरून कोणालाही जंतुसंसर्ग होणार नाही. स्वच्छ्ता करून जमलेला कचरा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या घंटा गाडीत टाकून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सदरील श्रमदानासाठी संस्थेचे कर्मचारी विलास सूरवसे, बालाजी पांचाळ,वसंत टोपे, नदीम शेख,धैर्यशील मडके,पप्पू मडके, बिभीषण यादव,फरजना शेख, सुरक्षा रक्षक हनुमंत मुळीक,नगरपरिषद कर्मचारी,बस आगारातील कर्मचारी आणि ६० प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!