कळंब (महेश फाटक ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वछतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मराठी विषयाचे प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छतेचे महत्त्व हे स्वतःक्रियाशील सहभाग नोंदवून दिले तर आध्यात्मिक प्रबोधनातून विज्ञानवादी विचार मांडले असे प्रतिपादन करून त्यांचे योगदान सांगितले.
या कार्यक्रमात लिपिक आदित्य गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,निदेशक कोमल मगर,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड