कळंब ( माधवसिंग राजपूत यांजकडून ) – कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या काही वर्षापासून अनाधिकृत अतिक्रमणे होती. या माध्यमातून अवैध धंदे चोरीचे प्रमाण वाढले होते. सदरील अतिक्रमणे हटवावीत अशी वारंवार मागणी शेतकरी ,व्यापारी व हमाल यांनी केली होती अतिक्रमण धारकांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अतिक्रमणे काढण्याविषयी नोटीस बनवण्यात येत होत्या परंतु अतिक्रमणधारक आपली अतिक्रमणे काढण्यास तयार नव्हतॆ.अतिक्रमणे काढण्याविषयी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला होता याला आज मूर्त स्वरूप आले व दिनांक 23 सप्टेंबर रोजी ही अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविली गेली. मोहिमेत अडथळा होऊ नये व खबरदारीची उपायोजना म्हणून या परिसरातील रस्ते, गेट बंद, करण्यात आली होती अडत व्यापार व इतर व्यापारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचा 27 एकर 12 गुंठे एवढा परिसर असून यामध्ये अडत व्यापार शेतीमाल पूरक व्यापारी दुकाने व इतर हुकाने आहेत.वरील क्षेत्रापैकी 60 गुंठे क्षेत्रावर ही अतिक्रमणे होती बाजार समिती विकासासाठी तसेच शेतकरी व्यापारी व हमाल यांच्या सुरक्षिततेसाठी या अतिक्रमणे काढली पाहिजेत ही मागणी होत होती.आज सकाळी या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली. यासाठी पोलीस संरक्षण घेण्यात आले.शंभर पोलीस कर्मचारी ,चार जेसीबी,ट्रॅक्टर ,200 स्वयंसेवक ,एक ड्रोन कॅमेरा, चार कॅमेरे, नगरपरिषद अग्निशामक गाडी ,कळंब नगरपरिषद कर्मचारी ,कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी असे जम्बो पथक व यंत्रणा यासाठी तैनात होती.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे ,संचालक मंडळातील सदस्य ,सचिव दत्तात्रय वाघ , पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे ,कळंब नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे कर्मचारी यांचा या पथकात समावेश होता.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर