कळंब (विशाल पवार ) – मागील ७ वर्षापासून कळंब येथील फ्रेंड्स ग्रुप दरवर्षी शिवजन्मोत्सव एका आगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये साजरा करताना दिसून येतात . कळंब नगरी शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शिवभक्त याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी कळंबमध्ये येत असतात, या शिवभक्तांची अल्पोपहराची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी फ्रेंड्स ग्रुप कळंब मोठ्या हिरहिरेने तन मन धन लावून काम करत असतात. यावर्षीच्या शिवजयंती उत्सवामध्ये फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने एक क्विंटल पुलाव व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय शिवभक्तांसाठी करण्यात आली होती. तालुक्यातील विविध खेडेगावातून आलेले शिवभक्त यांनी अल्पोपहराचा आनंद घेतला. या शिवजयंती उत्सवामध्ये एक विशेष बाब म्हणजे समाजातील कोणत्याही व्यापारी किंवा कोणत्याही व्यक्तीकडून देणगी स्वीकारली जात नाही.फ्रेंड्स ग्रुपमधील २० मित्र एकत्र येतात व दरवर्षी सांस्कृतिक पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पुलाव व शुद्ध पिण्याचे पाणी मोठ्या आनंदाने पुरवतात. यावर्षीच्या शिवजयंतीच्या उत्सवाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे अल्पोपहार व पिण्याचे पाणी यासोबतच येणाऱ्या शिवभक्तांना शिवकालीन गुप्तहेर खातं कशाप्रकारे चाललं जायचं याची महती सांगणारा कार्यक्रम फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने शिवभक्तांसाठी दाखवण्यात आला. प्रारंभी सतीश पवार, महादेव शिंदे, सुहास जावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यासोबतच फ्रेंड्स ग्रुप मधील परशुराम देशमाने,विकास कदम,विनोद सागर व मनोज नरहिरे या सदस्यांनी गीत गायन देखील केले. यावेळी डॉ.धनाजी भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच शैलेश गुरव व नितीन महाजन यांनी शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या भाषणातून शिवभक्तांसमोर मांडला. फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य सतीश पवार, सुहास जावळे, संतोष घाटपारडे, डॉ.धनाजी भालेराव, विनोद सागर, गुरव शैलेश,महादेव शिंदे सर, विकास कदम, मनोज नरहिरे, अच्युत जगताप, आजु खान, नितीन महाजन, दयानंद शिंदे , सुहास कदम, गणेश मोरे मुज्जमिल मुजावर, सादेक सय्यद यांनी शिवजयंती उत्सवासाठी मोलाचे कार्य केले. फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने साजरी करण्यात आलेली शिवजयंती तसेच सर्व सदस्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नितीनजी काळे व अजित पिंगळे, राजेसिंह निंबाळकर हे देखील कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले