August 9, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!