कन्हेरवाडी – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्याविकास हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक श्रीमती सरला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त बक्षीस वितरण व गीत सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य अशोकराव कवडे हे होते .तर प्रमुख पाहुणे राजश्री शाहू कॉलेज ,लातूर चे माजी प्राचार्य जाधव , महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज ,लातूरच्या प्राध्यापिका सौ.जाधव तसेच पंचायत समिती कळंबचे माजी सभापती भास्करराव खोसे उपस्थित होते. या वेळी शालेय समिती चे अध्यक्ष तथा ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा चे संचालक ॲड.लालासाहेब शांधरराव कवडे ,सदस्य वसुदेवजी सावंत, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.सरला पाटील व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमांत प्रथमतः शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांचे शिवजयंती निमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली.शिवरायांच्या गौरव गीतावर लेझीम सह नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले.विद्यार्थ्यांना प्रथम सौ.जाधव यांनी शिक्षणासोबत संस्काराची जोड , कष्टकर्यामध्ये शिवबाची प्रतिमा पहावयास सांगितले. आगलावे यांनी विद्यार्थ्यांना ध्येयनिष्ठ होण्याचा सल्ला दिला. यानंतर राजश्री शाहू कॉलेज चे माजी प्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील संघर्ष , गुणवत्ता की पैसा याची निवड करण्यास सांगितली तसेच त्यांच्या अध्यापन काळातील अनेक अनुभव सांगून विद्यार्थी आणि उपस्थितांच्या ज्ञानात भर पडली. यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. लालासाहेब कवडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले ,यावेळी कुमरे ,मोरे सर , देशमुख, सेवक जेवे मामा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सू्रसंचालन माळी यांनी केले . अध्यक्षीय समारोपानंतर मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे घोषित करण्यात आले .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले