कळंब (माधवसिंग राजपूत ) – राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी विचार,दूरदृष्टी,न्याय निवाडा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन. महिलांचा सन्मान याचे संस्कार केले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श स्वराज्य निर्माण केले आज आपण आपल्या मुलावर संस्कार करण्यात कमी पडत आहोत संस्कारामुळे मुलांची जडणघडण होत असते असे विचार शिवव्याख्यात्या मोनिका काळे यांनी सेवा तालीम संघ शिवजयंती जयंती उत्सव समिती आयोजित व्याख्यानमालेतील शेवटचे सातवे पुष्प गुंफित असताना व्यक्त केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचा व कार्याचा महिलानी आदर्श घेऊन मुलावर संस्कार करावेत बहुभाषिक व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांना सहा भाषा अवगत होत्या असे सांगून महिलांनी पुस्तके वाचावी व इतर महिलांना वाचण्यासाठी सांगावे हळदी, कुंकू कार्यक्रमात पुस्तकाचे दान द्यावे , विचाराचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित महिला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.यानंतर शिवानी कापसे या विद्यार्थिनींनी जिजाऊ वंदना गायन केली. उपस्थित महिला प्रमुख पाहुणे धनश्री कवडे ,रुकसाना बागवान ,मिराताई चोंदे, मीनाक्षी भवर, प्रतिभा भवर,स्नेहा टोणगे, सुनंदा कापसे,उषा केंद्रे, सुनिता ताई अडसूळ ,दीपश्री वाघमारे, अश्विनी शिंदे,सुप्रिया होळे प्रियंका भवर ,संगीता घुले,भाग्यश्री काळदाते, रंजना कदम ,तवले मॅडम, रूपाली भाकरे यांचा महिला कार्यकर्त्यांनी सत्कार तसेच सुनंदा शिवाजी कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ संस्कार केंद्राच्या महिला सदस्यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात गेली आठ दिवस सूत्रसंचालक प्राचार्य महादेव गपाट, जिजाऊ वंदना गायन सई काळे , शिवानी कापसे या विद्यार्थिनींचा व कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण केल्याबद्दल एमडी लाईव्हचे रमेश अंबिरकर ,कॅमेरामन महामुनी, साऊंड सर्विस चे शकील भाई काझी,छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सुंदर कदम, काका चोंदे ,गायकवाड यांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक शिवाजी कापसे व अध्यक्ष शिवाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी केले प्रास्ताविक प्रा.संजय घुले यांनी तर आभार सी.आर.घाडगे यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले