बदलापूर ( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून १८ फेब्रुवारी) – *सेवा भीमासिंह रामावत तथा जगतगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती देशभर भक्तीभावाने साजरी झाली.आम्हीही बंजारा समाजात एकरूप झालो.नगरपरिषदेत “संत *सेवालाल महाराज”, यांच्या स्मृतिला वंदन केले. नतमस्तक झालो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर समाजमाध्यमांनी बिहार राज्यापेक्षा खालावला आहे असे सांगितले आहे.* *पत्रकार,साहित्यीकांनी विचारवंतानी मार्गस्थ करायचे अन् सरकार, लोकप्रतिनिधींनी सर्वांना विश्वासात( विरोधी पक्षांनाही) घेऊन* *राष्ट्राची उभारणी करायची.!टाॅलस्टाय,जाॅर्ज हेगेल,व्हाल्टेर,एफ.जे.ब्राऊन,अब्राहम लिंकन, अगदी म.फुले, महर्षी कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख,अनुताताई वाघ, प्र.* *के. अत्रे, कुसुमाग्रज,अण्णाभाऊ साठे, यांनी केलेली पायाभरणी अर्थात हा अनंतकाळापासून चालत आलेला संकेत,असो. १९ फेब्रुवारी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती,रयतेचे राज्य यावे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे,मुरारबाजी,नेताजी पालकर,कोंडाजी फर्जद,शिवा काशीद,यसाजी कंक, आशा शूरवीरांना अठरा पगड जाती, बारा बलुतेदार,सोबत घेऊन स्वराज्य आणले. सबंध हयात स्वराज्यालाच वाहिली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य, स्वराज्य समोर ठेवून मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर गणराज्य,समता बंधुता न्यायाने,संविधान आणले.संविधानिक मूल्यांवर बावनकशी निष्ठा असलेल्या,समताधिष्ठीत भारत निर्माणाची आस असलेल्या शेकडोंच्या काळजावर “तिरंगाध्वज”, लावून राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सन्मानित योगेश गोडसे सर, प्रशासक कुळगाव बदलापूर नगरपरिषद जिल्हा ठाणे, प्रशासकीय कामकाजाच्या बाहेर जाऊन सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून त्यांनी काम केले. आजही टाटा पावर अधिग्रहणापूर्वीचा पाहणी सर्वे असो,विविध विकास योजना असो, “गोडसे साहेब”, कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सेवा बजावणारा अधिकारी,आंतरिक तळमळ उराशी असेल तर अपात काळात पूर परिस्थितीचा आढावा रात्री दीड वाजता घेणारा अधिकारी आमच्या नजरेला भावला. वैचारिक, राजकीय मतभेद आपापल्या ठिकाणी ठेऊन, आपण इतरांची गुणवत्ता खुल्या दिलाने अधोरेखित करणार नसू तर आपल्या सारखे कपाळकरंटे आपणच नाही का? मुख्याधिकारी, प्रशासक ते बढती आयुक्त. .Go ahead Hon.Godse sir.!
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले