August 9, 2025

महाराष्ट्र विद्यालयात निरोप समारंभ संपन्न

  • उपळाई – कळंब तालुक्यातील उपळाई येथील महाराष्ट्र विद्यालयात दि.१५ फेब्रुवारी २०२४ वार गुरुवार रोजी ईयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव व शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा बारबोले-बेडके ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक ठोंबळ हे उपस्थित होते.
    या दिनाचे औचित्य साधून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेत आलेले अनुभव भाषणातून व्यक्त केले व कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा बारबोले-बेडके यांनी १० वी च्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सोनवणे यांनी केले.
error: Content is protected !!