कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी नम्रता दत्तात्रय पौळ हिची बीड तलाठी पदी निवड झाल्याबद्दल दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक जाफर पठाण व पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. नम्रता चे इयत्ता ८वी ते १० वी शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालयात झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने हे यश संपादन केले. तिने तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास समर्थ स्पर्धा परीक्षा केंद्रात केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनसिंह ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर गोंदकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वर तोडकर, प्रकाश पाळवदे, परमेश्वर मोरे, तानाजी गोरे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले