August 9, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धाराशिव तालुका व विद्यार्थी विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवडी

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.09) विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
    महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व म्हणून नामदार अजित (दादा) पवार यांच्याकडे आजची पिढी पाहत आहे.राज्यातील दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पदाधिकारी पक्षाशी जोडला जात आहे.त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व व मार्गदर्शन तसेच तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांचे धाराशिव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य यावर विश्वास दाखवत धाराशिव तालुक्यातील पदाधिकारी यांनी पदाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.
    जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूम परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप व धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले. तालुका सचिव पदी रवीकुमार शाहीर घुटे,तालुका संघटक पदी बाळासाहेब महादेव गरड,चिखली गणप्रमुख पदी हृदयेश्वर उत्तरेश्वर सुरवसे,त्याचप्रमाणे विद्यार्थी तालुका सचिव पदी अभिजीत अरविंद मुंडे,विद्यार्थी तालुका उपाध्यक्षपदी कोतवाल बिलाल मिनहाज,प्रदीप भैरू फेरे,विद्यार्थी तालुका सरचिटणीस पदी कुलदीप तुकाराम मोरे यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका) धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.
    राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्यावतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र घेतल्यानंतर आपण दिलेल्या या संधीचे नक्कीच सोने करून व तालुका व जिल्हा मध्ये पक्ष संघटन व बांधणी साठी योगदान देऊ असे यांनी यावेळी सांगितले.
    यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या सह माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,धर्मराज गटकळ,दादा बारस्कर,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,युवक जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर,ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब ननवरे,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर गाढवे,धाराशिव शहर उपाध्यक्ष मुजावर अल्ताफ, सौरभ घोगरे, करण सुरवसे, ओम वाघमारे, दीपक वाकळे, अमर जाधव, रवी धुळे,कुलदीप मोरे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!