ईटकूर (अमोल रणदिवे) – कळंब तालुक्यातील ईटकूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक परिक्षांच्या माध्यमातुन यशस्वी मार्गाकडे वळविण्याचे काम करीत असुन ते शालेय वेळ न पाहाता सकाळी लवकरच शाळेत हजर राहुन मुलांना विविध स्पर्धात्मक परिक्षांचे मार्गदर्शन करून त्यांना परिक्षा देण्यासाठी त्यांची तयारी करून घेवून त्यांना परिक्षा देण्यास प्रवृत्त करणे आदि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमांतुन जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शालेय विद्यार्थी घडताना दिसत आहेत . म्हणूनच स्पर्धात्मक परिक्षांचे जादा तास घेवून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या परिश्रमातुन एनएमएमएस या घेण्यात आलेल्या परिक्षेत ३९ पैकी २७ विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली आहे . घेण्यात आलेल्या परिक्षेत १८० पैकी पुढील प्रमाणे गुण घेवून हे यशस्वी विद्यार्थी झाले आहेत यामध्येवैष्णवी विक्रम आडसूळ – १२५,आदित्य महेश देवकर – १२५,प्रीती प्रदीप गाडे – १२३,सिद्धी संतोष कानडे – ११६,प्रांजली तुकाराम आडसूळ – ११५,दिव्या वाल्मिक कोळी – १०६,आसावरी अमोल रणदिवे – १०५,राधिका रामभाऊ गंभीरे – १०४,प्रतिक्षा दत्तात्रय फरताडे – १०२ ,सार्थक सुरेश सावंत – ९९,सिद्धी बापूराव आडसूळ – ९८,आर्या आनंद गाडे – ९७,दिव्या जनक आडसूळ -९३,संस्कृती संजय आरकडे – ८८,सिद्धी विकास बावळे – ८३,समीक्षा बालाजी आडसूळ -८०, सोनाली शंकर गायके – ७९,आदित्य रमेश गायकवाड -७८,अवधूत बाळासाहेब एकशिंगे – ७५,श्रेयस सतीश बावळे – ७५,प्रणव बापू माने – ७३,कृष्णा सुधाकर वाघमारे – ७३,विक्रांत विकास शिंदे – ७२,मानसी सुभाष गाडे – ७१,यश आबासाहेब कदम – ६९,गौरी श्रीकांत चव्हाण – ६६,सुदीप बालाजी शिंदे – ५९. शाळेतील एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी २७ – पात्र तर १२ – अपात्र झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक श्रीम.काझी एन. एम्,अनिल क्षिरसागर ,श्रीम. अंजली यादव यांचे मार्गदर्शन लाभले तर यशस्वी विद्यार्थ्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्याप व जि. प. प्रशाला इटकूरचे शिक्षकवृंद ,शालेय व्यवस्थापन समिती,गावकरी मंडळी यांच्याकडून यशस्वीतांचे अभिनंदन करण्यात आले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले