कळंब :- शहरातील कष्टकरी हमाल मापाडी गुमास्ता यांना संघटित करून त्याला न्याय व त्यांच्या अधिकारासाठी काम करणारे भैरू मामा गुंजाळ यांची ओळख आहे भैरू मामा गुंजाळ यांचे कुटुंब कष्टकरी वडील मजुरी करायचे परंतु मुलांनी शिकलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा त्याकाळी मारुती मास्तर हारकर व महादेव मास्तर सुरवशे हे लहान मुलासाठी शाळा चालवत होते त्यांच्या शाळेत इयत्ता पाचवी पर्यंत मराठी व मोडी या भाषेत त्यांचे शिक्षण झाले त्या काळात प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांचा मराठा पेपर वाचण्याचा छंद लागला यातून अंगी निर्भीडपणा व डाव्या विचाराचा प्रभाव तयार झाला कळंब शहरातील असंघटित कामगारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार बळावला कळंब ची बाजारपेठ आडत, किराणा कपडा व्यापार यासाठी प्रसिद्ध आहे साहजिकच या ठिकाणी आडत व दुकानांमध्ये काम करण्यासाठी कामगार म्हणून गुमास्ते तसेच हमाल मापाडी काम करतात त्यांच्यासाठी कायदे आहेत परंतु त्यांना या कायद्याप्रमाणे अधिकार व वागणूक मिळत नाही त्याची जाणीव असल्याने भैरू मामा गुंजाळ यांनी पुढाकार घेऊन कळंब शहरात गुमास्ता तसेच हमाल मापाडी यांच्यासाठी १९६४ मध्ये संघटना स्थापन केली १९७२-७४ मध्ये दुष्काळ पडला होता गुमास्ता चळवळीतील असल्याने कोणी दुकानदार कामावर घेण्यास तयार नव्हते सरकारने कळंब येथे खडी केंद्र सुरू केले होते या खडी केंद्रावर वडिलांबरोबर खडी फोडण्याचे काम केले या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी कळंब येथे खडी केंद्राला भेट देण्यासाठी आल्या होत्या त्या काळात धनेगाव तलावाचे काम सुरू होते या शेतकऱ्यांच्या जमिनी तलावासाठी घेण्यात आल्या होत्या त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक असल्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागण्याचे निवेदन देण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर दिली व निवेदन दिले पुढे शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला व वस्तीसाठी जागा मिळाली याचबरोबर त्यांनी कळंब शहरात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस व तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वागत घडवून आणले कामगार चळवळीत कामगार नेते म्हणून जॉर्ज फर्नाडिस प्रसिद्धीच्या शिखरावर होते खासदार म्हणून निवडून आले होते बार्शीहून अंबाजोगाईला जाणार होते त्यांनी कळंबला थांबावे त्यासाठी प्रयत्न सुरू केले बार्शी येथील ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा बार्शी येथे भेट घेऊन संपर्क केला दिवस मकर संक्रांतीचा होता पन्नालालजी सुराणा यांना तिळगुळ दिले त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी संपर्क करून १८/१/ १९६८ ही तारीख निश्चित केली यानुसार जॉर्ज फर्नांडिस यांचा कळंब येथे तत्कालीन नगराध्यक्ष मारुतीराव मास्तर हरकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार केला कळंब तसेच भैरू मामा गुंजाळ यांच्यासारख्या तरुण व तडफदार कार्यकर्ते नगरपरिषदेत सदस्य म्हणून असले पाहिजेत हा विचार कळंब शहरातील श्रीमंत व्यापारी व समाजवादी विचार श्रेणीचे भगवानदासी जी लोढा यांनी मांडला व नगरपरिषद निवडणुकीत ११ नंबर वार्ड मधून निवडणूक लढवण्यासाठी सांगितले निवडून ही आले पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती आणीबाणीच्या समर्थनार्थ त्यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने ठराव मांडला होता गुंजाळ मामानी त्याला विरोध केला आणीबाणीला विरोध असणाऱ्यांची तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांची धरपकड चालू होती ठरावाला विरोध आहे हे नगर परिषदेच्या प्रोसिडिंगमध्ये नोंद झाली असल्यामुळे जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकारी चौकशीसाठी व अटक करण्यासाठी आले परंतु तत्कालीन नगराध्यक्ष नारायणराव करंजकर दादा यांनी अटक होऊ दिली नाही अधिकाऱ्यांना परत पाठविले पुढे सत्तांतर झाले केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते अंबाजोगाईला कळंब मार्गे जात असताना कळंब येथे सत्कार करण्याचे ठरविले यासाठी त्याकाळचे समाजवादी चळवळीतील किसनलालजी जाजू यांच्या सहकार्याने आणि ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार बापूसाहेब काळदाते तसेच महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्या मृणालताई गोरे ज्यांची ओळख पाणी वाली बाई अशी होती त्यांनी कळंब येथे तत्कालीन परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्काराचा कार्यक्रम निश्चित केला नगराध्यक्ष नारायणराव करंजकर दादा यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम घेण्यात आला गुमास्ता व हमाल मापाडी यांच्यासाठी काम करीत असताना स्वतःचा उदरनिर्वाह चालावा म्हणून मोडी चांगली येत असल्याचा फायदा म्हणजे आडत दुकानात खाते लिहिण्याचे काम मिळाले आपल्या प्रमाणे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या कष्टकरी कामगार गुमास्ता, हमाल, मापाडी व सर्व सामान्य नागरिकांसाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता आयुष्यभर काम केले दोन मुले व दोन मुली आहेत सर्व पदवीधर आहेत सरकारी नोकरीत कोणी नाही त्यांचे ठीक आहे याचे समाधान आहे वयाची ८० वर्ष पूर्ण झाली आहेत वयोवृद्ध पती-पत्नी एकाएकी जीवन जगत आहेत अल्पशा मिळणाऱ्या मदतीत दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात या वयातही भाजी आणण्यासाठी प्रत्येक रविवारी स्वतः येतात डोळ्याच्या ऑपरेशन झाले आहे त्यांचे बालपणीचे मित्र साहेबराव वाडे यांनी त्यांना आधार व मदत केल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी ही माहिती देत असताना केला या सर्व आठवणी सांगताना आपण काहीतरी समाजासाठी व कामगारासाठी केले असल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर