कळंब- कळंब शहरातील राज्य बँकांनी मागासवर्गीय नागरिकांना किती लाभ दिला या बाबतचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने दि.१फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कळंब शहरातील सर्व राज्य बँकांनी मागासवर्गीय नागरिकांना २०१८पासुन ते२०२४ पर्यंत किती लोकांना कर्ज वाटप केले व किती नागरिकांचे नामंजूर केले या बाबत चौकशी करून १० दिवसात माहीती द्यावी अशा मागणी चे निवेदन दिले आहे. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,ए.बी.एस क्रांती फोर्स चे मराठवाडा उपाध्यक्ष हनुमंत पाटुळे, जिल्हा निरिक्षक एन.जी.हौसलमल,अँड आर.बी.कांबळे, बजरंग धावारे, नारायण कोल्हे उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले