कळंब – येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील सहशिक्षक परमेश्वर चत्रभुज मोरे यांना नुकताच आट्या – पाट्या या खेळातील उत्कृष्ठ कामगीरी बाबत शै. वर्ष 2020-21 चा जिल्हा गुणवंत क्रीडामार्गदर्शक हा पुरस्कार पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक जे.एन. पठान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्या डॉ. श्रीमती मिनाक्षीताई शिंदे ( भवर) , पर्यवेक्षक काकासाहेब मुंढे, समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभाताई शिंदे , तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. परमेश्वर मोरे यांनी जिल्हा संघटनेच्या मदतीने सावित्रीबाई फुले विद्यालयातून आट्या – पाट्या या खेळाचा प्रसार केला ,अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळवले तसेच कळंब शहरातात त्यांच्या प्रयत्नातून 2014 साली पहिली राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यांच्या यशाबद्दल रणसम्राट क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मनोरमाताई शेळके , सचिव अॅड . चत्रभुज भवर , उपाध्यक्ष श्री.पी.एन भवर , कार्याध्यक्ष श्रीधर (बाबा) भवर यांनीही अभिनंदन केले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर