उमरगा – सुप्रसिद्ध समाजवादी विचारवंत, ज्येष्ठ समाजसेवक आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष साथी पन्नालालजी सुराणा यांना धाराशिव येथील अ.भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, बलसूर (ता. उमरगा) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सभागृहात येत्या रविवारी ४ फेब्रुवारी रोजी त्यांना तो प्रदान करण्यात यावयाचा आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात कमलाकरराव भोसले यांना साने गुरुजी शिक्षकरत्न पुरस्कार व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारही वितरित करण्यात येणार आहे. या समारंभाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार हे सांभाळत आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.विक्रम काळे, आ. ज्ञानराज चौगुले, अ.भा. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष श्यामराव कराळे, कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, प्रमुख कार्यवाह सुनिल पुजारी, शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी.आर.पाटील, स्वारातिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मधुकर गायकवाड, कथामालेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डी.के. कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामजीवन भांगडिया,श्रीहरी जाधव,सुरेश टेकाळे,शिवकुमार बिराजदार, प्रभाकर कापसे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कथामालेचे धाराशिव कार्याध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, उपाध्यक्ष प्रेमचंद देवसाळे, अनंत सूर्यवंशी, प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी, दिलीप पाटील, डी.डी. शेरे, ए. टी. माने, हिरालाल पवार आणि शिवशंकर जळकोटे प्रभृतींनी केले आहे.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय