June 22, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 165 कारवाया करुन 99,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)आत्माराम पांडुरंग मुळजे, वय 42 वर्षे, रा. रा. एकोंडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 13.00 वा. सु. मार्केट यार्ड गेट समोर उमरगा येथे अंदाजे 3,535 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या 80 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर 2)अनिल प्रभु कोळी, वय 22 वर्षे, रा. रा. एकोंडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 17.50 वा. सु. एकोंडी जाणारे रोडच्या बाजूला एकोंडी गावात येथे अंदाजे 8200 ₹ किंमतीची सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर 3)रितेष बाबुराव भिसे रा. औराद ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 18.20 वा. सु. सुधाकर मारुती गायकवाड यांचे शेताचे समोर औराद येथे अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 75 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)अमर अनिल मुळे, वय 24 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 16.30 वा. सु. सलगरा दि. गावचे हद्दीत गंधोरा रोडलगत पत्रयाचे शेडचे समोर अंदाजे 2,100₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • तुळजापूर पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)हनुमंत बाबुराव कोळी, वय 42 वर्षे, रा. कसई, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर कसई ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)गणेश लक्ष्मण जाधव, वय 23 वर्षे, रा. चिखली ता. जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 12.30 वा. सु. शिवगुरु नगर चिखली येथे ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 945 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.21.01.2024 रोजी 14.00 वा. सु. जहागिरदार वाडी तांडा येथील सचिन किराणा दुकानाचे मागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सचिन तुकाराम राठोड, 2) केशव तोळाराम राठोड, 3) सुखदेव गोपीनाथ चव्हाण, 4) प्रथ्वीराज तुकाराम चव्हाण, 5)प्रभाकर हरीबा चव्हाण, सर्व रा. जहागिरदारवाडी तांडा ता. जि. धाराशिव, 6) राजाभाउ देवराव पवार, रा. शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव हे सर्वजन 14.00 वा. सु. जहागिरदार वाडी तांडा येथील सख्चिन किराणा दुकानाचे मागे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 87,160 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : मयत नामे-प्रकाश साहेबराव डोंगरे, रा. बाबुलतार, ता. पाथरी जि. परभणी यांनी दि. 07.10.2023 रोजी 04.30 ते 06.00 वा. सु. ईटकळ येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- कृष्णा परमेश्वर कांदे, 2) अमोल परमेश्वर कांदे, 3) गोविंद कांदे सर्व रा. रेवली, ता. परळी जि. बीड यांनी संप्टेबर 2023 ते दि.07.10.2023 रोजी पर्यंत मयत प्रकाश डोंगरे यांचा मुलगा महेंद्र डोंगरे यास उस तोडण्यासाठी तीन लाख तीस हजार रुपये दिले होते. पंरतु महेंद्र डोंगरे हा पुणे गेल्याने नमुद आरोपी हे मयत प्रकाश डोंगरे यांना सतत तुझा मुलगा कारखाना सुरु होण्या अगोदर ट्रॅक्‌टरवर आला पाहीजे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून प्रकाश डोंगरे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचा मयताची पत्नी- सुनिता प्रकाश डोंगरे, वय 45 वर्षे, रा. बाबुलतार ता. पाथरी जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 323 504,506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2))व्हिए), 3(2)(व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अंजुम शहाबाज शेख, वय 30 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव, या दि. 20.01.2024 रोजी 12.15 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे धाराशिव हैद्राबाद बसमध्ये चढत असताना अंदाजे 1,25,000 ₹ किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अंजुम शेख यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)बालाजी शिवाजी भोसले, 2)मनिषा बालाजी भोसले, 3) वर्षा बालाजी भोसले, 4) श्रध्दा धुमाळ, 5)श्रध्दा धुमाळ, 6) शिवशाला महादेव भोसले, 7) महादेव भोसले, 8) विठ्ठल पोपट भोसले, 9) शिवाजी मानिकराव भोसले, 10) व्यंकट पोपट भोसले, सर्व रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 08.30 ते 09.00 वा. सु. खामसवाडी ता.जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-प्रियंका परमेश्वर भोसले, वय 36 वर्षे, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव या व त्यांची मुलगी प्रज्ञा यांना नमुद आरोपी हे शिवीगाळ करत होते ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, पाईप, विटाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा शंभु हा भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन पाईपने मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रियंका भोसले यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे -1) परमेश्वर पांडुरंग भोसले, 2) प्रियंका परमेश्वर भोसले, 3) गौरी प्रज्ञा परमेश्वर भोसले, शंभु परमेश्वर भोसले, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव, 5) शाम उत्तमराव होनसनाळे, 6) प्रविण शाम होनसनाळे, 7) बंटी शाम होनसनाळे रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 08.30 ते 09.00 वा. सु. खामसवाडी ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-बालाजी शिवाजी भोसले, वय 48 वर्षे, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांचा नातु शिवांश वय 2 वर्षे यांने आरोपी नामे गौरी प्रज्ञा हिस धरल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी भोसले यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे आरोपी नामे-1) विमल विलास पवार, 2) श्रीकृष्णा विलास पवार, 3) श्रीधर विलास पवार, 4) विलास दत्तात्रय पवार, 5)श्रीराम विलास पवार, सर्व रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 14.30 वा. सु. कसबे तडवळा व कोंबडवाडी शेतशिवार येथे फिर्यादी नामे- रेशमा राहुल लाटे, वय 37 वर्षे, रा. गजानन मेडीकल कसबे तडवळा ता. जि. धाराशिव हा.मु. टिंगरे नगर विश्रांत वाडी पुणे यांना व त्यांची आई, बहीण, भाउ यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्यादीची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड,विळा, लोखंडी साखळी त्याला बळींबा असलेलीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेशमा लाटे यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324,354, 323, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे आरोपी नामे-1)मिरा भारत पवार, 2) सौदागर भारत पवार, 3) सौरभ मांगडे,4) सौरभ हावलदार, 5) ज्योती भारत पवार, 6) चंद्रभारत पवार, 7) सोनी भारत पवार, 8) माउली भारत पवार सर्व रा. कसबे तडवळा यांनी दि. 21.01.2024 रोजी 14.00 वा. सु. शेत गट नं 76 कसबे तडवळा शिवार येथे फिर्यादी नामे- विलास दत्तात्रय पवार, वय 69 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्यादीची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी साखळीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा भांडण सोडवण्यास गेला असता त्यांसही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास पवार यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ नुकसान करणे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)महादेव राम माळी, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 19.30 वा. सु. काटगाव शिवारात शेत गट नं 253/ब/3 मधील फिर्यादी नामे-अविनाश जगन्नाथ म्हेत्रे, वय 62 वर्षे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे व मदन किसन माळी, उज्वला नामदेव माळी या तिघांचे उसाला आग लावून धमकी देवून उसाला आग लावून उसाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश म्हेत्रे यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 435, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • अधिवासी समाजातील समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय कटिबध्द – अतुल कुलकर्णी
  • टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई- तुळजापूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तडवळे कसबे येथे ग्रामीण सामुदायिक भेट, सामुदायिक जनसुनावणी व कायदेशीर मार्गदर्शन शिबीरा प्रसंगी मा. राजेश गुप्ता, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश -1 कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून अतुल कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक,वसंत यादव, सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण,धाराशिव,श्रीमती स्वाती जमाले,सरपंच,ग्राम सेवक आडे,टिसचे डॉ. देवकुमार जेकब,गणेश चादरे, कार्यक्रम समन्वयक आदिवासी सामाजातील जेष्ठ कार्यकर्ते शंकर पवार, आबा पवार, नाना पवार, सिध्देश्वर काळे सरपंच पळसप व L.L.M (अक्सेस टू जस्टिस) स्कुल ऑफ लॉ,राईटस ॲड कॉन्स्टिटयुशन गव्हर्नन्स टीस मुंबईचे विद्यार्थी व अधिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, धाराशिव जिल्हृयातील अधिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीर, शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती कार्यक्रम व त्यांच्या मुलभुत समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त होत असुन हा समाज बदलत असल्याचे समाधान व्यक्त केले. या कार्यात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आसल्याचे सांगितले. या प्रसंगी राजेश गुप्ता, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश-1 म्हणाले की, अधिवासी समाजातील मुलामुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असुन शिक्षण हे कौटुंबिक प्रगती व देशाच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगितले. या प्रसंगी वसंत यादव यांनी जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी समाजातील शंकर पवार, आबा पवार, नाना पवार, सिध्देश्वर काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. आणखीन मोठ्या प्रमाणात समाजाला विविध योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गणेश चादरे म्हणाले की, टीसच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या विविध अभ्यासाचा फायदा आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला. डॉ देवकुमार जेकब यांनी अभ्यास भेटीचा उद्देश सांगून कायदेविषयक मार्गदर्शन केले. टीच विद्यार्थी यांनी ही यावेळी शिक्षणाचा अधिकार, मुलांचे अधिकार, बालविवाह या विषयांर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार केतन पवार यांनी मानले.
error: Content is protected !!