August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा

  • कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रो.दादाराव गुंडरे यांनी सविस्तर नामांतर लढ्याचा इतिहास सांगितला तसेच या लढ्यात २५ लोकांनी या हौतात्म्य पत्करले असे प्रतिपादन केले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा व विचारांचा त्यांनी गौरव केला.याप्रसंगी प्रो.संजय कांबळे अधिसभा सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, उपप्राचार्य.प्रो.हेमंत भगवान, उपप्राचार्य.प्रो.सतीश लोमटे,उपप्राचार्य प्रा.पंडित पवार, प्रो.दीपक सूर्यवंशी,डॉ.कमलाकर जाधव ,डॉ.ईश्वर राठोड, डॉ. हरिभाऊ पावडे, डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.अमोल शिंदे,डॉ. विश्वजीत मस्के ,प्रा.अप्पासाहेब मिटकरी, प्रा. टेकाळे, प्रा.संदीप देवकते,प्रा.शाहरुख शेख ,डॉ. समाधान चंदनशिवे,प्रकाश गायकवाड, हनुमंत जाधव,अरुण मुंढे,विनोद खरात,अमोल सुरवसे,कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे,इकबाल शेख,मारुती केचे,उमेश साळुंके, संदीप सूर्यवंशी,रुमने, लिमकर ,पाडोळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नामानंद साठे,डॉ.संदीप महाजन, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!