धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांनुसार येणाऱ्या काळात सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करणे व पक्ष संघटना मजबुतीने उभा राहण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य सरचिटणीस विनोद भांगे यांच्या मान्यतेने ऋषिकेश देशमुख,समर्थ नगर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य (भैय्या) गोरे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या हस्ते ऋषिकेश देशमुख यांना नियुक्ती पत्रक देवून यथोचित सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल ऋषिकेश देशमुख यांचे परिसरातील युवावर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला