August 9, 2025

नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात संपन्न

धाराशिव – ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३० वा नामविस्तार दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात संपन्न झाला. इतिहासातुन भविष्याचा वेध घेता येतो. आजच्या काळामध्ये इतिहासाचे महत्व समजुन घेणे आवश्यक आहे. प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.महेंद्र चंदनशिवे, विभागप्रमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य व नामविस्तार पार्श्वभूमी विषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक, डॉ. विक्रम शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना १ जुन १९४९ रोजी करून मराठवाडयामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात केली. उच्च शिक्षण हे सर्व आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगतीचे मूलाधार आहे. सर्व प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य विचारात घेऊन विद्यापीठाचा नामविस्तार झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे विश्वात्मक मानव मुक्तीचे व कल्याणाचे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व निश्चियी, धाडसी व स्वाभिमानी होते. विविध पदव्या ज्ञान साधनेतुन घेणारे साधक होते. सत्यप्रिय, न्यायाचे रक्षक होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणुन नामांतराचा लढा चालला. १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार झाला. स्वाभिमान, स्वावलंबन व आत्मोद्धार हि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची त्रिसूत्री होती. मुलामुलींसाठी स्वतंत्र व शासकीय वसतिगृहे असली पाहिजेत. अर्थसंकल्पाच्या १० टक्के खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, असे डॉ. बाबासाहेबांचे विचार होते. दर्जेदार उच्च शिक्षणांतून आपला देश हा महासत्ता बनु शकतो, मत त्यांनी मांडले. दर्जेदार उच्च शिक्षणांतून आपला देश हा महासत्ता बनु शकतो. प्राथमिक ते पदव्यूत्तर शिक्षण हे पूर्णपणे अनुदानित व दर्जेदार कौशल्याधारित व मूल्यांनुसार असले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय तत्वावर विकास करून शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करता येईल. शिक्षणाचा उपयोग त्यांनी देशहितासाठी व राष्ट्रहितासाठी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी नामांतर लढ्याची राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट केली. १९७२ मध्ये विकास आंदोलनातुन नामांतराची मागणी पुढे आली. प्रतिगामी व पुरोगामी असा विचाराचा संघर्ष होता. ध्येयनिष्ठ, कर्तव्याभिमुख शैक्षणिक कार्यातुन विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. उच्च शिक्षण हे सर्व प्रकारच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे, भूमिका त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापन शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी केले. इंग्रजी विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे यांनी आभार मानले. कक्षाधिकारी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख जितेंद्र कुलकर्णी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशन हावळ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, डॉ. महेश्वर कळलावे, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आंनंदगावकर, संजय जाधव, रवींद्र सोनवणे, स्वीय सहाय्यक श्रीकांत सोवितकर, अभियंता प्रवीण आळंगे, ग्रंथालय कनिष्ठ सहायक मल्लिनाथ लामजणे, वीजतंत्री हेमंत कांबळे, प्रल्हाद इंगळे, राहुल कामठे, मस्के, विठ्ठल कसबे, सर्व विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

error: Content is protected !!