कळंब – सकल कळंब च्या वतीने महाराणा प्रताप यांच्या चौकापासून मोटार सायकल रॅली ला सुरुवात झाली.त्या नंतर ही रॅली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते आण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चौक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य दिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना पंचशील घेऊन अभिवादन करुन नामविस्तार लढ्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सुनील गायकवाड,सतपाल बनसोडे,अनिल हजारे, डॉ.संजय कांबळे,राहूल हौसलमल,अमर गायकवाड, कुणाल मस्के, अभिजीत हौसलमल, परमेश्वर समुद्रे, बंडुभाऊ बनसोडे,किशोर वाघमारे, सनी मस्के,सचिन गायकवाड, भैय्यासाहेब देशमाने, विनोद समुद्रे, राजाभाऊ गायकवाड, सुखदेव दादा गायकवाड,डि.जी. हौसलमल, शिवाजी शिरसट, सम्राट गायकवाड,संजित हौसलमल, शिलवंत बप्पा,संजित मस्के, सुरज वाघमारे, डि.टी.वाघमारे, सिध्दार्थ वाघमारे,प्रमोद ताटे, राहूल गाडे )व ईतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले