कळंब – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, हेलंस व मानस फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन शिवपार्वती माध्यमिक विद्यालय वाघोली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूल प्रशालेतील किशोरी गटात कु.सायली जाधवर ,कु.प्रणिता कदम,कु सिध्दी पवार,कु.हिना शेख या विद्यार्थिनींनी कथाकथन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. किशोरी गटातून कु.सायली जाधवर या विद्यार्थिनीने कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या मिळवलेल्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस,पर्यवेक्षक दिगंबर खामकर,मराठी विभाग प्रमुख सोपान पवार, क्रीडा विभाग प्रमुख सतीश कानगुडे यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. या कथाकथन स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थिनींना मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांनीना कथा कशी लिहावी?, कथाकथन कसे सादरीकरण करावे?, कथेचे वाचन कसे करावे?, याविषयी मार्गदर्शन केले. या यशामुळे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,क्रीडा शिक्षक विजयकुमार ढोले ,संदीप पाटील ,अशोक राऊत ,सुनील जळकोटकर तसेच आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले