August 9, 2025

सुभाष घोडके यांची गुरु प्रती कृतज्ञता ..!

  • कळंब (महेश फाटक )  – अधिस्वीकृती धारक संपादक सुभाष द.घोडके यांनी त्यांच्या एकसष्टी निमित्त दि.१४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता पुर्नवसन सावरगाव येथील एम.डी.पुरी गुरुजींच्या घरी जावून सत्कार करत त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.के. कुलकर्णी,जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,पत्रकार परमेश्वर खडबडे,महेश पुरी,माजी नगरसेविका गीता पुरी,प्रा.अविनाश घोडके यांची उपस्थिती होती. गुरुजींच्या सत्कारानंतर जुन्या आठवणीस उजाळा देत असतानी एम.डी.पुरी गुरुजी म्हणाले की,सुभाष हा माझा विद्यार्थी होता. वयाच्या ६१ व्या वर्षी सुद्धा ८० वर्ष वय असणाऱ्या गुरुजी विषयीची भावना हृदयात जतन करून ठेवल्याचा मला सुभाषराव घोडके यांचा अभिमान असून आजच्या काळात संस्कार शून्य पिढीसमोर आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.
    पुरी गुरुजींनी सेवा काळातील काही आठवणी सांगत असतानी वयाच्या ६ व्या महिन्यात आईचे निधन झाले असता थोरल्या बहिणीने स्वतःचे दूध पाजून आईचे प्रेम वात्सल्य दिले तर मेहुण्यांनी वडिलांचे छत्र दिले. स्वतःभिक्षा मागून शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक म्हणून संस्कृत पिढी घडवण्याचे भाग्य लाभले अशी हृदयाला पाझर फोडणारी वास्तविकता कथन केली.
error: Content is protected !!