August 9, 2025

दर्पणदिनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, माहिती व जनसंपर्क संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

  • लातूर (दिलीप आदमाने) – मराठी पत्रकार दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, नि.माहिती व जनसंपर्क संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
    जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, संपादक जयप्रकाश दगडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नृसिंह घोणे, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ.श्याम टरके, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस अशोक माळगे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, कायदेशीर सल्लागार ॲड. राम गजधने आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले. संघटनेच्या वतीने उपस्थित पत्रकारांची मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.
    प्रत्येकाने ध्येयनिष्ठ पत्रकारिता करावी. नितीमुल्य जपत वंचित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणावे. समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुल्याधिष्ठित पत्रकारितेची गरज असल्याचे मत गवळी यांनी मांडले. तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पत्रकारांसाठी आहेत. त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने संघटित होऊन जनजागृती करावी, असे मत दगडे यांनी मांडले. जांभेकरांच्या जीवनचरित्रावर माळगे यांनी प्रकाश टाकला. कास्ट्राईबच्या भूमिकेबाबत मस्के यांनी माहिती दिली. कास्ट्राईब व कर्मचारी संघटनांना पत्रकार बांधव सातत्याने पाठबळ देत असल्याबद्दल पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कास्ट्राईबचे जिल्हा संघटक नागरत्न कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिक्षक संघटनेचे मानकुसकर यांनी आभार मानले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप वाठोरे, संजीवकुमार सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी, किशोर गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
    पत्रकारांचा सन्मान
    कार्यक्रमात विविध माध्यमातील संपादक, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गवळी,दगडे, घोणे,अशोक चिंचोले,चंद्रकांत झेरीकुंठे,मधुकर चलमले,महादेव कुंभार,अभय मिरजकर,दीपरत्न निलंगेकर,श्रीधर स्वामी,दिगांबर तारे,काकासाहेब गुट्टे,हरिश्चंद्र जाधव,चंद्रकांत इंद्राळे,विनोद चव्हाण, प्रभाकर शिरुरे, मुरली चेंगटे, शिवाजी कांबळे, धोडींराम ढगे, अशोक हनवते, पंडित हणमंते, शिवाजी जडे, लिंबराज पन्हाळकर, अफसर कारभारी, शेख महेताब, लहु शिंदे, रामकिसन नादरगे, राजाभाऊ जाधव, पंकज जेस्वाल आदिंचा समावेश होता.
error: Content is protected !!