कळंब ( अरविंद शिंदे ) – स्फ्रूर्ती फाउंडेशन आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला. खुल्या वक्तृत्व स्पर्धेत, जिल्ह्यातील एकूण २९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर प्रकाश भडंगे (सामाजिक कार्यकर्ते), संतोष भांडे(अध्यक्ष शिवतेज मार्गदर्शन केंद्र), सौ.वनिताताई कटाळे (जिल्हा चिटणीस, भाजपा), शिवाजीराव गिड्डे (जिल्हा समन्वयक, भाजपा आणि अध्यक्ष,स्फ्रूर्ती फाउंडेशन ), मकरंद पाटील(प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा),अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली. प्रारंभी पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला, त्याचे स्वरूप प्रथम पारितोषिक तीन हजार शंभर, द्वितीय पारितोषिक दोन हजार शंभर, तृतीय पारितोषिक एक हजार शंभर तर तीन उत्तेजनार्थ पारितोषिक आणि प्रमाणपत्र आहे. विजेत्यांची निवड जाहीर करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत साक्षी संजय तोष्णीवाल प्रथम, भाग्यश्री विजयसिंह वाघमारेला द्वितीय क्रमांक, साक्षी बाळासाहेब वटाणे तृतीय तर उत्तेजनार्थ बारसकर आकाश सतीश, चव्हाण अमृता परशुराम यांनी प्राप्त केले. त्यासाठी स्पर्धेचे विषय होय, रामराज्य येत आहे, विश्व गुरू भारत, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर , शेती व शेतकरी यांचे भवितव्य, डिजिटल इंडियाचे भविष्य, आजचा विद्यार्थी दशा आणि दिशा आणि लोकशाहीत समाज माध्यमांची भूमिका हे विषय ठेवण्यात आले होते. असे ०५ विषय होते. विजेत्यांना लवकरच पारितोषिक वितरण केले जाणार आहे. प्रास्ताविक अध्यक्ष श्री शिवाजी गिड्डे यांनी तर प्रकाश भडंगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, स्पर्धकांच्या भाषणाचे मराठी विभागप्रमुख डॉ.दादाराव गुंडरे, प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी आणि मुस्तान मिर्झा (मुद्याच बोलू डिजिटल चॅनेलचे, संपादक) यांनी परीक्षण केले. यावेळी प्रा.किरण बारकुल, प्रा.प्रताप शिंदे, प्रा.पाटील, प्रा.खोसे,प्रा.शिवकन्या मांडे, प्रा. घाटपारडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.डॉ.दीपक सुर्यवंशी यांनी तर पारितोषीक वाचन आणि आभार प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी आभार मानले.या स्पर्धेसाठी अरविंद शिंदे, संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले