धाराशिव (जिमाका) – देशातील ट्रक व टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे तेलशुध्दीकरण केंद्रावरुन जिल्ह्यातील पेट्रोल,डिझेल पंपावर होणारा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा खंडित होऊन जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे या परिस्थितीत अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊन कोणतीही आपत्तीजनक स्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने तेलशुध्दीकरण केंद्रावरुन जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपांना करण्यात येणारा पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळित सुरु होईपर्यंत जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप चालकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा हा रुग्णवाहिका तसेच आरोग्यसेवा विभागात कार्यरत असणारी अत्यावश्यक वाहने,पोलिस विभागाकडील वाहने,सरकारी वाहने, अग्निशामक वाहने तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक वाहने यांच्यासाठी राखीव ठेवावा व इतर वाहनांना पेट्रोल व डिझेलची विक्री करु नये. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक,सर्व उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. या आदेशाची अंमलबजावणी आज 2 जानेवारीपासून तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला