April 3, 2026

गुरु-शिष्य नात्याचा जिवंत आदर्श;परदेश दौऱ्यानंतर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांचा शिष्याकडून भावपूर्ण सत्कार

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा प्रेरणादायी आणि जिवंत प्रत्यय कळंब येथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व आणि ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव गुरुवर्य डॉ.अशोक (दादा) मोहेकर यांच्या यशस्वी परदेश दौऱ्यानंतर त्यांचे शिष्य डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
    शिक्षण महर्षी गुरुवर्य ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंबचे माजी प्राचार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र,धाराशिवचे माजी संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले डॉ. अशोक (दादा) मोहेकर हे नुकतेच सपत्नीक परदेश दौऱ्यावरून परतले.या दौऱ्यात त्यांनी विविध देशांतील शैक्षणिक पद्धती, सामाजिक रचना आणि सांस्कृतिक परंपरांचा सखोल अभ्यास करून आपला अनुभव अधिक समृद्ध केला.
    या यशस्वी दौऱ्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा जि.धाराशिव येथील सहयोगी प्राध्यापक तथा त्यांचे शिष्य डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी कळंब येथे भेट देऊन शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.
    यावेळी डॉ.चंदनशिवे यांनी व “गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच आजचा प्रवास शक्य झाला,”अशी भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी गुरुवर्य डॉ.मोहेकर यांनीही आपल्या शिष्याचे कौतुक करत,“शिष्याच्या प्रगतीतच गुरुचा खरा आनंद दडलेला असतो,” असे सांगत त्यांना आशीर्वाद दिले.तसेच शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.
    या प्रसंगी डॉ.विद्याधर नलवडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    गुरु-शिष्य नात्याची परंपरा जपणारा हा प्रसंग उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.आजच्या स्पर्धात्मक युगातही संस्कार, आदर आणि कृतज्ञतेची भावना जिवंत असल्याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
error: Content is protected !!