April 3, 2026

‘जय हनुमान तालीम संघा’चा सामाजिक उपक्रम;हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • कळंब – हनुमान जयंतीच्या पवित्र औचित्याचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करत कसबा पेठ,कळंब येथील जय हनुमान तालीम संघाच्या वतीने दि.२ एप्रिल २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत आयोजित या उपक्रमाला परिसरातील तरुणांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.
    शिबिरास सकाळी १० वाजता सुरुवात झाली असून,
    अल्पावधीतच ९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.विशेष म्हणजे अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करत समाजकार्यात आपला सहभाग नोंदवला.
    या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक शितल चोंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,तालीम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना तालीम संघाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान तालीम संघाच्या स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. शिबिरातील रक्तसंकलन कळंब येथील रेणुका रक्तपेढीच्या माध्यमातून करण्यात आले.
  • 🛑 नगरसेवक शितलकुमार चोंदे यांचा पुढाकार;सामाजिक बांधिलकीचा संदेश –
    या रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक शितलकुमार चोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.धार्मिक उत्सव साजरा करताना समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
    यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी तरुणांनी पुढे येणे ही काळाची गरज असून,अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता निर्माण होते.रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी तरुणांनी पुढे येणे ही काळाची गरज असून,अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता निर्माण होते.
error: Content is protected !!