हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते शुभारंभ;अवधूत ढगे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा
कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहनांचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘आनंद इलेक्ट्रिक मोटर्स’ या नव्या व्यवसायाचे उद्घाटन कळंब येथे उत्साहात पार पडले.ढोकी रोडवरील त्रिवेदी कॉम्प्लेक्स, सुरमई मंगल कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) दिगांबर मडके यांच्या शुभहस्ते फीत कापून या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गावर आर्थिक ताण येत असताना इलेक्ट्रिक वाहन हा किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.”१ रुपयात सुमारे ५ किलोमीटर प्रवास” असा कमी खर्च येत असल्याने भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अधिक वाढेल,असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना हनुमंत (तात्या) मडके यांनी ‘आनंद इलेक्ट्रिक मोटर्स’ या उपक्रमाचे कौतुक करत अवधूत ढगे यांच्या उद्योजकीय धाडसाचे अभिनंदन केले.कळंबसारख्या शहरात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करून युवकांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात,असे त्यांनी सांगितले. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अवधूत ढगे यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा. साक्षी पावन ज्योत या वृत्तपत्राच्या वतीनेही व्यावसायिक अवधूत ढगे व रोहिणी ढगे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले संपादक सुभाष द. घोडके यांच्या लेखणीतून साकारलेल्या या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी अवधूत ढगे व रोहिणी ढगे यांना सप्रेम भेट देऊन त्यांच्या नव्या व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या शोरूममधून विविध प्रकारच्या आधुनिक इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री,मार्गदर्शन व ग्राहक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे कळंब व परिसरातील नागरिकांना कमी खर्चात आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाचे आयोजक संभाजी भिमराव ढगे,अवधूत संभाजी ढगे आणि सौ.रोहिणी कवडे-ढगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य अनंत लंगडे,शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटच्या संचालिका सौ.रुक्मणी मडके,हेड ऑफिस अधिकारी इम्रान शेख,कळंब शाखेचे व्यवस्थापक फुलचंद मडके,उद्घाटन सोहळ्यास व्यापारी,मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आता पेट्रोल नाही… भविष्य चालवा!” या संदेशासह ‘आनंद इलेक्ट्रिक मोटर्स’ने कळंब शहरात बचतीचा आणि स्वच्छ ऊर्जेचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ⚡🚲
More Stories
कळंब शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव;तात्काळ उपाययोजना न झाल्यास मराठा सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा
धाराशिव जिल्ह्यात तातडीने दारूबंदी लागू करा; दारू मुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रमजान निमित्त ‘एहसास’ची माणुसकीची उब;१५० राशन किट,सहरी टिफिन व रमजान टाइमटेबल कार्डचे वाटप