August 9, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन;विद्याभवन हायस्कूल कळंब येथे प्रतिमा पूजन

  • कळंब–ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ मार्च २०२६ वार गुरुवारी रोजी विद्याभवन हायस्कूल कळंब येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षण प्रसारासाठी आयुष्यभर झटणाऱ्या मोहेकर गुरुजींच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी,असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
    कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम अत्यंत श्रद्धा व आदरभावनेने पार पडला.
error: Content is protected !!