March 6, 2026

पदविधर मतदारांसाठी सुवर्णसंधी ०५-औरंगाबाद विभागाची अंतिम यादी जाहीर,नोंदणी सुरूच

  • धाराशिव (जिमाका)– भारत निवडणूक आयोगाने दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि.१२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
    अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित पदविधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याबाबत आयोगाने निर्देश दिले आहेत.त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघासाठी अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र पदविधरांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.
    यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पात्र पदविधर मतदारांनी आपले अर्ज संबंधित तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!