March 2, 2026

छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंबमध्ये ‘काव्योत्सव’ उत्साहात संपन्न

  • कळंब – मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब येथील मराठी विभागाच्या वतीने ‘काव्योत्सव’ या कार्यक्रमाचे दिमाखात आयोजन करण्यात आले.“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या काव्यपंक्तीने कार्यक्रमाला सुरेख सुरुवात झाली.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हनुमंत माने होते. प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.
    बाळकृष्ण भवर,प्रा.प्रतिभा गांगर्डे, ह.भ.प. कवडे महाराज, प्रा.शशिकांत जाधवर,डॉ.
    विद्युलता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) तसेच संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
    कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे निमंत्रित कवींचे संमेलन. प्रा.शेखर गिरी,प्रा.महादेव गपाट, प्रा.डॉ.दादाराव गुंडरे,श्री.आश्रुबा कोठावळे,प्रा.शफीक चौधरी,डॉ. अनिल जगताप,श्रीमती रोहिणी कवडे,श्रीमती सारिका देशमुख, श्रीमती गवळी मॅडम तसेच विद्यार्थिनी प्रतिक्षा बचुटे,पुनम राक्षे,आकांक्षा कवडे व कु.श्रुती जाधव यांनी आपल्या दर्जेदार कवितांनी रसिकांची मने जिंकली.
    प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर यांनी अध्यक्षांविषयी शीघ्र कविता सादर करताना –“पाठीशी होती आई-वडिलांची पुण्याई…” अशा ओळींनी उपस्थितांना भारावून टाकले.त्यांच्या ‘कळी कमळाची’ या कवितेलाही उत्स्फूर्त दाद मिळाली.प्रसिद्ध गझलकार प्रा. शेखर गिरी यांनी –“कण कण या पृथ्वीवरचा हा पेटवतो की काय?”
    अशी प्रभावी गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
    प्रा.महादेव गपाट यांच्या आईच्या महत्त्वावर आधारित कवितेने, तर श्री. आश्रुबा कोठावळे यांच्या बालसाहित्य शैलीतील रचनेने श्रोत्यांच्या मनात घर केले. प्रा. डॉ. दादाराव गुंडरे यांनी सामाजिक भान जपणारी कविता सादर केली.नवोदित कवयित्री श्रीमती रोहिणी कवडे यांनी स्त्रीत्वाच्या वेदना मांडताना –“नव पहाटे उमेदीने ध्येयाकडे निघते…”
    या ओळींनी टाळ्यांचा कडकडाट मिळविला.
    अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांनी ‘तुला म्हणून सांगते’ ही कविता सादर करून स्त्रीमनातील भावविश्व उजागर केले.
    कार्यक्रमाचे नियोजन प्रा.एस. एस.जाधवर व ग्रंथपाल प्रा. डॉ. पवार व्ही. एस. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव गपाट यांनी, प्रास्ताविक प्रा. शशिकांत जाधवर यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!