February 22, 2026

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी येथे ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा

  • कळंब–कॅनव्हास इंटरनॅशनल एम स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी,कळंब येथे दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवजन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
    याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नरहिरे,प्रिन्सिपल पवन कुलकर्णी सर तसेच विज्ञान विभागप्रमुख सांजेकर सर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवि नरहिरे व उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे यांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे शिवरायांचा इतिहास जिवंत केला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय भवानी’ या गीतावर आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘आले मराठे’ या गीतातून शौर्य व पराक्रमाचा संदेश दिला. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी ‘जय भवानी’ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले.
    समृद्धी किरपे (इयत्ता सातवी) हिने आपल्या दमदार व पहाडी आवाजात शिवचरित्रावर आधारित पोवाडा सादर करून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा उलगडली. तसेच सिनियर केजीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करून शिवरायांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनुष्का मोरे व स्वरा माने यांनी केले.
    प्रिन्सिपल पवन कुलकर्णी सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शिवाजी महाराजांच्या कार्याची महत्ता, स्वराज्य संकल्पना व आदर्श नेतृत्वगुण विद्यार्थ्यांसमोर मांडले.
    सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक,कर्मचारी व सेवक यांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. देशभक्तीच्या घोषणांनी व टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!