कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,कळंब येथे दि.३० जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे प्रिन्सिपल पवन कुलकर्णी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सहशिक्षक हर्षद मस्के व सत्यम उमरदंड यांनी गांधीजींचे प्रेरणादायी व अनमोल विचार उपस्थितांसमोर मांडले.तसेच गांधीजींच्या सहकार,स्वदेशी, अहिंसा व मूल्योद्योगी शिक्षणपद्धतीचा अंगीकार करून जीवनात त्यांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष रवि नरहिरे, उपाध्यक्षा आशा नरहिरे व सचिव प्रणव नरहिरे यांनी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून गांधीजींचे विचार अंगीकृत करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार