September 20, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर यांना श्रद्धांजली

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे दि.२९ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमाप्रसंगी विद्यामंदिरातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रम शांत व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
error: Content is protected !!