February 8, 2026

बार्टी प्रेरणेने कळंबचा अमर रणदिवे CRPF मध्ये यशस्वी!

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) उपक्रमांच्या मदतीने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून स्वप्नपूर्ती करणारा अमरदीप अशोक रणदिवे (२७,रा.समता नगर) हा कळंबचा युवक स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय रिजर्व राखीव बल (CRPF) परीक्षेत यशस्वी झाला.
  • “तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेबांच्या प्रेरणेने देशसेवेची दुर्दम्य इच्छा बाळगणाऱ्या अमरच्या यशाने कुटुंब,नाते-रक्ते व शेजारील परिसरात आनंदाची लहर उसळली आहे.वडील अशोक रणदिवे हे एसटी महामंडळ कळंब येथे सहाय्यक यांत्रिकी पदावर कार्यरत असून,अमर हा पूर्वी पुणे येथे नोकरीसाठी होता.अमरचे मित्र प्रकाश मधुरकर (सातारा – पोलीस),नरेंद्र भवाळ (पिंपरी-चिंचवड -पोलीस) यांच्या यशाने प्रेरित होऊन २०१९ पासून तयारीला सुरुवात केली.१० ते १२ पोलीस भरती परीक्षा दिल्या. शालेय काळात एनसीसीमध्ये नंबर न आल्याने निराश झालेल्या अमरने “सेनेची वर्दी घालून देशसेवा करीन” ही प्रतिज्ञा केली.
    अमरचे शिक्षण हे प्राथमिक-माध्यमिक (विद्याभवन हायस्कूल),अकरावी-बारावी (मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड-जालना), बीएससी बायोटेक्नॉलॉजी (राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट,संभाजीनगर) या ठिकाणी झाले.
    कळंब समर्थ अकॅडमीचे संचालक बनेश्वर शिंदे,प्रशिक्षक बप्पा उबाळे यांचे सखोल मार्गदर्शन व सेल्फ स्टडीमुळे यश आले असे अमर रणदिवे सांगतो.तसेच बहीण डॉ. संपदा रणदिवे,भाऊ रत्नदीप रणदिवे व मित्र किरण सोनवणे (२०१६-२०२४) यांचे पूर्ण सहकार्य मिळाले.
    अमर रणदिवे याचे CRPF मधील यश हे बार्टी उपक्रम,कुटुंब समर्थन, गुरूंचे मार्गदर्शन व अथक परिश्रमाचे प्रतीक आहे. अमर रणदिवे कळंब तालुक्यातील युवकांसाठी हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
    प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने अमरला सचिव व कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी अंकाची भेट देवून त्याला भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!