गुरुवारपासून थेट विक्रीला सुरुवात – कळंब APMC चा ऐतिहासिक निर्णय!
कळंब – राजमा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठी सुविधा! कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) च्या पुढाकाराने ईटकुर येथे राजमा उपबाजारपेठ सुरू होत आहे. गुरुवारपासून थेट राजमा खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांना आता दूर जाऊन विक्री करण्याची गरज नाही!व्यापाऱ्यांसोबत बैठक: सहमती आणि तयारी पूर्ण या उपबाजारपेठेसाठी कळंब APMC ने राजमा खरेदीदार व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. चालू हंगामातील ईटकुर परिसरातील शेतकऱ्यांचा उत्पादन डेटा संकलित करून व्यापाऱ्यांना बोलावले गेले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख व्यापारी दिल्ली हर्ष गुप्ता,सत्कार गांधी सातारा-कोरेगाव निलेश घाडगे पाटील,प्रमोद बलदोटा,बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ,श्रीकांत चव्हाण,बाळकृष्ण थोरबोले,विशाल हजारे यांच्यासह कर्मचारी आदींची उपस्थिती होती.त्यांनी थेट शेतकऱ्यांकडून राजमा खरेदी करण्यास सहमती दिली.ही बैठक यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह! सभापतींचे सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी – सभापती शिवाजी कापसे,उपसभापती श्रीधर भवर आणि संचालक मंडळाने उपबाजारपेठ सुरू करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले.अखेर हे स्वप्न साकार झाले! आता शेतकरी परिसरातच चांगऱ्या किमतीत राजमा विकू शकतील. वाहतुकीचा खर्च वाचेल,नुकसान टाळता येईल.
*शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन – सभापती शिवाजी कापसे आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांना आवाहन – गुरुवारपासून सुरू होणाऱ्या खरेदी केंद्रावर आपला राजमा विक्रीसाठी नक्की आणावे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड