February 8, 2026

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने वाद–विवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला

  • कळंब – शिवसेना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट,कळंबचे सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथील बी.एस्सी.एस.वाय.या वर्गात शिक्षण घेत असलेली कु.श्रुती जाधव हिने वाद–विवाद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
    निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता लोप पावत आहे/नाही या विषयांवर वाद–विवाद स्पर्धा जनविकास महाविद्यालय,बनसारोळा (ता.केज,जि.बीड) येथे १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत कु.श्रुती जाधव हिने विषयाची प्रभावी मांडणी,स्पष्ट विचारसरणी व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेत तृतीय क्रमांक पटकावला.तिला आयोजकांकडून रोख रक्कम,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तिच्या या यशासाठी तिला प्राचार्य.डॉ.हनुमंत माने,डॉ.अनिल जगताप,डाॅ.मल्हार शिंदे,डॉ.रघुनाथ घाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल छ.शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य.डॉ.हनुमंत माने व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे कु.श्रुती जाधव यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सहाध्यायी विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!