वाहन नोंदणी, परवाने व अर्ज सेवांसाठी नागरिकांना मोठा दिलासा
धाराशिव (जिमाका) – नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात सुलभता यावी,वेळ व खर्चाची बचत व्हावी तसेच शासकीय सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.या उपक्रमामुळे वाहन नोंदणी,वाहन चालक परवाना तसेच विविध अर्ज व दुरुस्ती प्रक्रियेसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्याची आवश्यकता राहत नाही. या अनुषंगाने जानेवारी २०२६ महिन्यातील विशेष वाढीव शिबीर कार्यालय तालुका कळंब येथे दि. १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर कळंब तालुक्यातील नियोजित ठिकाणी पार पडणार असून तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वाहन चालक परवाना काढणे व नूतनीकरण, वाहन नोंदणी,मालकी हस्तांतरण, दुरुस्ती,विविध प्रमाणपत्रे,शुल्क भरणे तसेच परिवहन विभागाशी संबंधित अडचणींचे निराकरण एका ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार असून कार्यालयीन कामांसाठी होणारी धावपळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तरी दि.१९ जानेवारी २०२६ रोजी कळंब येथे आयोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान