धाराशिव – धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संघटनेचे अरुण बनसोडे,दिलीप वाघमारे व सुनील बनसोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त विजय गायकवाड यांनी नामांतर लढ्यातील आपल्या अनुभवांना उजाळा दिला.नामांतर सत्याग्रही म्हणून ठाणे सेंट्रल कारागृहात १७ दिवस कारावास भोगल्याच्या आठवणी सांगताना त्यांनी,मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेला लढा हा अत्यंत अपूर्व,संघर्षमय व रोमहर्षक असल्याचे भावनिक शब्दांत नमूद केले.या लढ्यामुळेच सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त करून नामांतर चळवळीतील योगदानाचे स्मरण केले.कार्यक्रमास संघटनेचे अरुण बनसोडे,दिलीप वाघमारे,अशोक बनसोडे,सुनील बनसोडे,ॲड. अजय वाघाळे,बलभीम कांबळे, प्रदीप शिंदे,प्रभाकर बनसोडे, बाळासाहेब माने तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामविस्तार दिनानिमित्ताने बोधीसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा जागर,सामाजिक समतेचा संदेश आणि नामांतर लढ्यातील बलिदानाची आठवण करून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड