February 9, 2026

प्रबुद्ध रंगभूमीच्या कार्यातून ग्रामीण संस्कृतीला नवी दिशा – सुनंदा कापसे

  • रौप्य महोत्सवी कलाकार सन्मान सोहळ्यात गौरवोद्गार
  • कळंब — प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब यांच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कलाकार सन्मान सोहळ्यात कळंब नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी संस्थेच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की,प्रबुद्ध रंगभूमी संस्थेचे कार्य हे केवळ कला क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन घडवणारी चळवळ आहे.या संस्थेमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना न्याय मिळत असून बहुजन संस्कृतीला नवी ऊर्जा मिळत असल्याचे ठोस प्रतिपादन केले.
    प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नाट्य,लोककला,भीमगीते,हरी जागर,कीर्तन,भारूड,अभंग, संगीत,अभिनय,पत्रकारिता व सामाजिक-राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५५ कलाकारांचा सन्मान करण्यात आला.पानगाव,उमरा,बावी,लातूर आदी गावांतील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
    या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वारकरी साहित्य परिषद धाराशिव जिल्हाध्यक्षा ह.भ.प.सौ. सुनीतादेवी आडसूळ या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) महिला तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, काँग्रेस आयच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई सपाटे,पत्रकार बालाजी आडसूळ, ह.भ.प.उत्तरेश्वर लोखंडे,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ आदी मान्यवरांनी सांस्कृतिक चळवळीला बळ मिळाले असून कलाकारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले.
    उपस्थित होते.
    संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत ग्रामीण कलाकारांसाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.सूत्रसंचालन सचिव अविनाश घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन माधवसिंग राजपूत यांनी मानले.
error: Content is protected !!