August 6, 2026

धाराशिव मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे नव्या नगरसेवकांचा सत्कार; नागरिकांच्या अपेक्षांना दिला उजाळा

  • धाराशिव – मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे धाराशिव नगरपरिषद येथील विविध प्रभागातून बहुमताने निवडून आलेले सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप भैय्या मुंडे,आकाश तावडे व अक्षय जोगदंड यांचा भव्य स्वागत समारंभ घेण्यात आला.संभाजी हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमात छोटेखानी खाद्यसंमेलन ठेवण्यात आले होते.
    या स्वागत समारंभाचे आयोजन माजी सभापती सतीश घोडेराव यांनी केले होते.यावेळी ग्रुपमधील सदस्य कदम नाना,घुटे बप्पा,
    दिलीप वाघमारे,राघवेंद्र देशपांडे, मंडलिक,धुपे,शिंदे नाना,चित्राव गोरे,नाग टिळक,पिंटू भैय्या कोकाटे,वाकुरे दादा,सुधीर एखंडे, विकास वराडे,लक्ष्मण माने, बुवासाहेब घोगरे,आप्पा धावारे, आराफत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी उपस्थितांनी येणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीत नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे सोने करीत विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात,अशा भावना व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांकडून नव्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
error: Content is protected !!