कळंब – तालुक्यातील देवधानोरा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गपाट व महेश माने यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विविध लेखकांची प्रेरणादायी पुस्तके देत पुस्तकांचे वाचन करून घेऊन महामानवास आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गपाट व प्रा.राऊत यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावीची विद्यार्थीनी पूजा मुळे हीने तर आभार नहाणे ए.एन. यांनी मानले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी